हिंदळे येथील कार्तिक स्वामी दर्शनाचा योग

देवगड,दि.६ नोव्हेंबर

हिंदळे येथील श्री. कार्तिक स्वामी मंदिरात शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ ९.५५ ते शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर २४ रोजी पहाटे २.५९ मिनिटांपर्यंत श्री. कार्तिक स्वामी दर्शन योग आहे. तरी भाविकांनी दर्शन योगाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन श्री कार्तिक स्वामी उत्सव समिती हिंदळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.