शासनाकडून मंजूर झालेल्या रस्त्याचे काम त्वरित सूरू व्हावे

नांदरुख, कातवड सरपंच व ग्रामस्थांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

मालवण,दि.२ फेब्रुवारी

तालुक्यातील आनंद‌व्हाळ – कालवड- नांदरूख याणि साळकुंभा – कातवड – नांदरुख या प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत असलेल्या दोन रस्त्यांची दुरावस्था प्रश्नबाबत कातवड, नांदरूख, आनंदव्हाळ आणि आंबडोस येथील ग्रामस्थांनी नांदरुख सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण व कातवड सरपंच सौ. प्रतिक्षा ऋषिकेश हळदणकर यांच्या नेतृत्वात उप अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कुडाळ कार्यालय येथे भेट दिली. शासन स्तरावून मंजूर असलेल्या या रस्त्यांचे काम 15 दिवसात सूरू करावे. अशी मागणी केली आहे.

यावेळी कातवड उपासरपंच गणेश चव्हाण, सदस्य भागश्री चव्हाण, अक्षता नाईक, काजल घाडी, ग्रामस्थ गोविंद चव्हाण, काशिनाथ चव्हाण, दशरथ पोखरणकर, हेमंत मेस्त्री, सिद्धेश साळकर, मांजरेकर, रश्मी चव्हण, संगीता खरवते, भालचंद्र बिरमोळे, निलेश चव्हण, प्रतिभा खरवते आदी उपस्थित होते.

रस्ता प्रश्न बाबत उपस्थित अधिकारी यांनी मंजूर रस्त्याची निविदा जादा दराने असल्याने ही बाब वरिष्ठ स्तरावर असल्याचे सांगितले. या रस्त्याची निविदा जादा दराने भरणा झाल्याने समस्या निर्माण झाली. ठेकदार दर कमी करण्यास तयार नसल्याने ही बाब वरिष्ठ स्तरावर गेली. लवकरात लवकर येत्या बैठकित यासाठी मंजुरी घेऊन कामाला सुरवात करण्याचा प्रयत्न आहे. असे आश्वासन वरिष्ठ अधिकारी स्तरावरून ग्रामस्थांना देण्यात आले.

दरम्यान 15 दिवसात रस्ता काम सूरू करण्याबाबत कार्यवाही न झाल्यास आदोंलन केले जाईल असा इशारा उपस्थित शिष्टमंडळाने दिला.