माजगाव मनविकास ग्रंथालयातर्फे २७ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

सावंतवाडी,दि.२ फेब्रुवारी

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळच्यावतीने मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी असणा-या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतिनिमित्त राज्य शासनाचे सुचनेनुसार मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम साजरा करण्याचे संस्थेने ठरविलेले आहे. त्यानुसार खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेसाठी निबंधाचे विषय : १) मला अभिप्रेत असलेले सुराज्य २) आजची

कुटुंबव्यवस्था ३) कोरोनानंतरचे जनजीवन हे असून सहभागी सर्व स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर सुमारे १००० शब्दापर्यंत आपल्या सुवाच्च हस्ताक्षरामध्ये कागदाचे एकाच बाजूस निबंध लिहून माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळ माजगाव ता. सावंतवाडी पिन ४१६५१८ कडे टपालाद्वारे किंवा समक्ष कार्यालयीन वेळेत आणून देण्याचे आहेत. स्पर्धकाने निबधाच्या कागदावर आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणा-या विजेत्या स्पर्धकांना संस्थेतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून बक्षिस कार्यक्रमाबाबत स्पर्धकांना आगऊ सूचना देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ. मधू कुंभार, मोबा. ८४०७९२५७५३ यांचेशी संपर्क साधावा.

तरी आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त वाचनप्रेमी, नागरिक, विद्यार्थी, महिला इत्यादींनी या स्पर्धेत सहभागी होवून वाचन संस्कृतीचे जोपासना करावी असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत मुकुंद सावंत यांनी केले आहे.