हजारो झाडे युवकांनी आग विझविण्यासाठी झटल्याने वाचली
दोडामार्ग, दि.२ फेब्रुवारी
दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात शुक्रवारी भर दुपारी या ठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवर येथील वीज मीटर बाॅक्स मध्ये शाॅटसर्किट होऊन अचानक आगीचा भडका उडून वाळलेल्या गवताने पेट घेऊन ही आग वाऱ्याबरोबर पसरत येथील शेतकरी सुरेश लक्ष्मण गवस यांच्या बागेत शिरून दोन एकर प्लॉट मधिल दोनशे हुन जास्त काजू झाडे आगीच्या वणव्यात होरपळून जळून गेली यामुळे लाखांची हानी झाली आहे. मोर्ले, घोटगेवाडी, गावातील युवकांनी धावपळ करुन झाडांच्या फांद्या घेऊन जीव धोक्यात घालून दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवून इतरांची हजारो काजू झाडे वाचवली. या काजू बागायती मध्ये महिला साफसफाई करत असताना ही घटना घडली.