मोर्ले ते पारगड किल्ला चार वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी सरकारला अपयश लोकप्रतिनिधी यांचे दूर्लक्ष

 दोडामार्ग चंदगड ग्रामस्थांचे २० रोजी दोडामार्ग येथे उपोषण

दोडामार्ग, दि. २ फेब्रुवारी 

गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या शिवकालीन पारगड किल्ला याला जोडणारा मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता मार्गी लावण्यासाठी दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ मावळे यांनी संघर्ष केला अनेक आंदोलन उपोषण केल्यावर चार वर्षापूर्वी काम सुरू झाले. पण सुरू झालेले काम गेल्या चार वर्षापासून बांधकाम विभाग वन विभाग यांच्या तसेच राज्य सरकार लोकप्रतिनिधी यांच्या बेजबाबदार पणामुळे रखडले आहे. हा रस्ता मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने दोडामार्ग चंदगड तालुक्यातील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग येथे २० फेब्रुवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.