कणकवली, दि.७ नोव्हेंबर
खारेपाटण कोष्टी आळी व फोंडाघाट बाजारपेठ येथे कणकवली पोलिसांनी धडक कारवाई करून १७ हजार ९१० रुपयांची गोवा बनावटी दारू साठा जप्त केला. याप्रकरणी ज्योती जयवंत कांबळे (४८, रा. खारेपाटण कोष्टी आळी) व विनोद दिगंबर पवार (४८, फोंडाघाट बाविचे भाटले) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारेपाटण कोष्टी आळी येथे गोवा बनावटी विक्री होत असल्याची माहिती कणकवली पोलिसांची आली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी खारेपाटण कोष्टीआळी येथील ज्योती कांबळे यांच्या छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी १२ हजार ६० रुपयांची विनापरवाना साठा करून ठेवलेली गोवा बनावटी दारू जप्त केली. तसेच फोंडाघाट बाजारपेठ येथे बुधवारी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ५ हजार ८५० रुपयांची गोवा बनावटी दारू जप्त केली.