लोकसभेच्या निवडणुकीनंतर दीपक केसरकर यांची राजकीय घसरण सुरू होणार-खासदार विनायक राऊत

सावंतवाडी,दि.२ फेब्रुवारी
लोकसभेच्या निवडणुकीनंतर दीपक केसरकर यांची राजकीय घसरण सुरू होणार आहे त्यामुळे खुर्ची टिकवण्यासाठी आज ते उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत मात्र त्यांनी उगाच आमच्या आड येण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा शिवसेनेचे सचिव,खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिला.
तर उद्धव ठाकरे यांनी कोकणाला जे दिलं ते तुम्हाला आयुष्यभरही देता येणार नाही. ज्या राणेंची दलाली करायला केसरकर निघाले त्यांनी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात होऊ नये यासाठी दिल्लीत काय आकंडतांडव केला हे मी पाहिले आहे त्यामुळे विकासाच्या गोष्टी केसरकारांनी शिकवू नये असाही टोला खासदार राऊत यांनी लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सावंतवाडीत रविवारी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर पाहणे करण्यासाठी ते आज गांधी चौकात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा समन्वयक बाळा गावडे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब तालुकाप्रमुख रुपेश राऊळ रुची राऊत गितेश राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावरून केसरकर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत परंतु मल्टीस्पेशालिटी तसेच अन्य प्रकल्प लक्षात घेता विकासाच्या फायलीवर कसे बसायचे हे दीपक केसरकरांकडूनच शिकावं.
एकीकडे ज्या नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये यासाठी दिल्लीमध्ये आकांतांडव केले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं कारण हे महाविद्यालय झाल्यास आपल्या खाजगी हॉस्पिटलला त्याचा फटका बसेल त्यामागचे कारण होते परंतु आज विकासाच्या बाता करणारे केसरकर त्यांची दलाली करायला निघाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिलं असे म्हणण्यापेक्षा जे काही दिल ते तुम्हाला आयुष्यभर ही देता येणार नाही.
श्री राऊत पुढे म्हणाले, केसरकर यांनी दहशतवादाचा मुद्दा पुढे करून नारायण राणेंच्या विरोधात राजकारण केले तेच केसरकर आज दहशतवादाला खतपणी घालण्यासाठी नारायण राणेंची आरती ओवाळू लागले आहेत. मात्र केसरकर यांना आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी आहे अशा शब्दात निलेश राणे यांनी त्यांची केलेली टिंगल ते विसरले असतील परंतु जनता कदापि विसरणार नाही त्यावेळी राष्ट्रवादीतून लढलो तर आपला टिकाव लागणार नाही म्हणून त्यांनी शिवसेनेत उडी घेतली मंत्रीपद मिळवलं मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी करून फडणवीस यांची जवळीक साधली आता पुन्हा निवडणूक जवळ आल्याने ते राणेंची चाकरी करायला लागले आहेत.

चौकट
आगामी लोकसभा निवडणुकीच्या बाबत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे लवकरच बाबत निर्णय होणार आहे. उद्योजक किरण सामतं हे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत अलीकडेच त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेटही घेतली मात्र असे असले तरी भाजप त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम निश्चितच करणार असा टोलाही खासदार राऊत यांनी लगावला.