आजही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कोकणातील जनता ठामपणे उभी

राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य प्रभारी चैनीथला यांचे प्रतिपादन

मालवण,दि.२ फेब्रुवारी

देशात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला संधी निर्माण झाली असून आपल्या पक्षासोबत आघाडीत काही पक्ष आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी प्रत्येकाने शंभर टक्के बूथ सक्षम करा. त्यासाठी मतदारसंघ पिंजून काढावा. आजही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कोकणातील जनता ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य प्रभारी चैनीथला यांनी केले.

कोकण विभागीय राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक भिवंडी येथे पार पडली. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विलास गावडे, साक्षी वंजारी, रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनीष राऊत, माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, अॅड. गांगण, सुरेश काटकर, सुगंधा साटम, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, उल्हास मणचेकर, समीर वंजारी, विधाता सावंत, महेंद्र सांगेलकर, प्रदीप मांजरेकर, उमेश कुलकर्णी, भाबल आदी उपस्थित होते.

या बैठकीस जिल्हयातील इच्छुक उमेदवारांची सध्याची तयारी, मतदारसंघात केलेल्या पक्ष कार्याची व होणाऱ्या निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी बोलताना चैनीथला म्हणाले, देशाबरोबर राज्यात देखील काँग्रेस पक्षाला फार मोठी संधी निर्माण झाली असून युवक ही पक्षाची ताकद आहे. आणि आज पक्षात युवकांचा भरणा होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पक्ष बांधणीसाठी धर्याने कामाला लागावे त्यासाठी आवश्यक ते बळ पक्ष देईल असेही चैनीथला म्हणाले. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणून जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनीही आपण केलेल्या संघटनेतील कामाची यादी राज्य प्रभारी चैनीथला यांच्याजवळ दिली.