डॉ.देविदास हारगिले यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

मालवण,दि.२ फेब्रुवारी

मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयचे प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. देविदास विक्रम हारगिले यांना पुणे येथे राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने थोर साहित्यिक व विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार इंडियन स्टुडंट काउंसील व महाराष्ट्र संचालनालय पुरातत्त्व विभाग,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला.

या कार्यक्रमास अभिनेत्री पर्ण पेठे, अभिनेता संजय खापरे आणि इंडियन स्टुडंट काउंसील महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यादी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल कृ.सी देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेकतर कर्मचारी यांच्याकडून डॉ.हारगिले यांचे अभिनंदन करण्यात आले.