कोकण प्रांत मंत्री संकल्प फळदेसाई व अतुल काळसेकर यांनी दिली माहिती
सावंतवाडी दि.९ नोव्हेंबर
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ५९ वे कोकण प्रांत अधिवेशन येत्या २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी भोसले नॉलेज सिटी येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी परिषदेचे पुर्व नेते, माजी मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या अधिवेशनासाठी गोवा ते मुंबई मधील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित राहतील कोकण प्रांतात ६० वर्षानंतर प्रथमच अधिवेशन होतं आहे. या निमित्ताने नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा होताना कोकणासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक सुविधा निर्माण होण्यासाठी चर्चा होईल असे आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या अधिवेशनाबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांत मंत्री श्री संकल्प फळदेसाई व स्वागत समिती सचिव, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा संयोजक अथर्व शृंगारे ,सावंतवाडी शहरमंत्री स्नेहा धोटे, व्यवस्थापक चिन्मयी प्रभूखानोलकर, जिल्हा कार्यालय मंत्री तुषार पाबळे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, या अधिवेशनात विविध भाषण सत्र,चर्चासत्र, परिसंवाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक विषयांना धरून प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. अधिवेशना सावंतवाडी मधील मुख्य रस्त्यावरून विराट छास्त्रशक्तीची शोभायात्रा देखील निघणार आहे.तिचा समारोह प्रांतातील विविध जिल्ह्यातून आलेल्या छास्त्र नेत्यांच्या सभेतील भाषणाने होईल.
या अधिवेशनाचे स्वागत समिती अध्यक्ष सुप्रसिद्ध पैकाणे ग्रुपचे अध्यक्ष अतुल पैकाणे ,स्वागत समिती सचिव म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पदाधिकारी तथा माजी मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण असे मान्यवर उपस्थित राहतील असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी संकल्प फळदेसाई म्हणाले, कोकण प्रांतात मुंबई पालघर ते गोवा पर्यंत चे एक हजार विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित राहतील.या अधिवेशनातून नवीन संकल्प निर्माण करताना कार्यकर्ते निर्माण होतील.
सिंधुदुर्ग चे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले, या कोकण प्रांताचे अधिवेशनाला एक हजार विद्यार्थी उपस्थित राहतील. राज्यातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा मला बहुमान मिळालेला आहे. या परिसरातील पर्यटनाची आवड निर्माण व्हावी आणि ती सर्व दूर जाईल. या निमित्ताने गांधी चौकात जाहीर सभाही होईल. नवीन शैक्षणिक धोरण चर्चा, संस्कार अशा विविध अंगांनी या अधिवेशनात चर्चा होईल. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचा विस्तार, स्पर्धात्मक परीक्षा बाबत या अधिवेशनात नक्कीच चर्चा होईल.