मालवण,दि.२ फेब्रुवारी
ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका पदाधिकारी व सदस्य कार्यशाळा मार्गदर्शन शिबीर ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वा. या वेळेत समर्थ मंगल कार्यालय कोळंब पुलानजिक आयोजित केले आहे.
शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून ग्राहक न्यायालय माजी अध्यक्ष अॅड. राजेंद्र पैलवान, प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, एम. एस. इ. बी. मेडिक्लेम विभागप्रमुख डॉ. अमोल धर्मजिज्ञासू तहसीलदार मालवण वर्षा झालटे भोसले, देवगड तहसीलदार आर. जे. पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सागर सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर तर राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनःशाम सांडीम, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे तसेच ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संपर्कासाठी संतोष नाईक (९४०५२८८१८८), प्रमोद कांडरकर यांच्याशी संपर्क साधावा.