लक्ष्मीकांत खोबरेकर यांचा मालवण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार

 मालवण,दि.२ फेब्रुवारी

बॅ. नाथ पै सेवांगणच्या विश्वस्त आणि कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत उपकर्ते सभासदांमधून निवडून आल्याबद्दल लक्ष्मीकांत खोबरेकर यांचा मालवण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष विद्याधर केनवडेकर, उपाध्यक्ष उमेश मांजरेकर, दत्तात्रय केळुसकर, नीलेश पांजरी, सुभाष बिरमोळे, मनोज चव्हाण, स्वाती हळदणकर, शुभदा केनवडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका हळदणकर, लिपीक मोनिका तळगावकर, हंगामी लिपीक साक्षी सावंत आदी उपस्थित होते.

बॅ. नाथ पै सेवांगणच्या विश्वस्त व कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेचे प्रमुख आश्रयदाते व बॅ. नाथ पै यांचे सहकारी बाबूकाका अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांच्या पॅनेलने सर्व चौदाही जागांवर विजय संपादन केला होता. यावेळी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्य जोमाने पुढे नेण्यासाठी सर्व संचालक कार्यरत राहू नाथ पै यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असे स्पष्ट केले.