उबाठाचे असंख्य पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश; नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन प्रवेश
कणकवली, दि. ९ नोव्हेंबर
कणकवली तालुक्यातील कसवण येथील उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी, माजी सरपंच संजय सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य गणपत मेस्त्री, युवा सेना उपतालुकाप्रमुख कणकवली व माजी ग्राम सदस्य उमेश गुरव, रुपेश गुरव, विजय गावकर, गणेश गुरव आणि संतोष मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
कसवण गावातील युवा सेनेचे पदाधिकारी भाजपामध्ये आल्याने उबाठाला मोठा धक्का बसला आहे. या बदलामुळे स्थानिक राजकारणात भाजपा अव्वल ठरणार आहे. हा प्रवेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सर्व प्रवेश कर्त्यांचे स्वागत करून करण्यात आला.
या वेळी भाजपाचे समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, प्रशांत सावंत, यशोधन सरफे, अभय गावकर, बंड्या मालणकर, काना मालनकर, भाई सावंत, गोट्या गुरव, संतोष ओरसकर, किशोर मेस्त्री, मंगेश गुरव, प्रमोद तेली, समीर गावकर, पप्पू तळेकर, संतोष सावंत,एकनाथ सावंत, निलेश सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.