निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्साईडचे अपर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर सिंधुदुर्गात

बांदा, दि. ९ नोव्हेंबर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य उत्पादन शुल्कचे अपर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी इन्सुली येथील तपासणी नाका येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्व तात्पुरते व नियमित तपासणी नाक्यावरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे आदींसह जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.