तारकर्ली हॉलिबॉल प्रीमियर लीगचे उदघाट्न युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते

मालवण,दि.२ फेब्रुवारी
तारकर्ली येथे माघी गणेशोत्सव निमित्त श्री महापुरुष कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या तारकर्ली हॉलिबॉल प्रीमियर लीगचे उदघाट्न भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सौरभ ताम्हणकर यांनी श्री महापुरुष कला क्रीडा प्रतिष्ठान आणि स्वामी बॉईज यांचे कौतुक केले व युवा पिढीने असेच एकत्रित राहून आपल्या गावाचा व आपल्या समाजाचा विकास करू असे या वेळी सांगितले. हि स्पर्धा तीन दिवस प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे तर या स्पर्धेत तरुणांसोबत वयस्कर व्यक्तींचा देखील लक्षणीय सहभाग असतो.

या वेळी विनायक परुळेकर,घनश्याम कुबल,आशुतोष तुळसकर,चंद्रशेखर केळुसकर, प्रतीक कुबल गोरक्ष पराडकर,अनिल टिकम,कुणाल बापर्डेकर,गणपत मोंडकर,दिलेश कोळंबकर ,सर्वेश कुबल आदि ग्रामस्थ उपस्थित होते.