जि.प. आयोजित क्रिक्रेट स्पधेत देवगड संघ फायनलमध्ये

देवगड,दि.२ फेब्रुवारी

जिल्हा परिषद सिंधुदूर्ग आयोजित क्रिडा स्पधेत पहिल्या दिवशी क्रिकेट मध्ये मुख्यालय संघाला हरवत देवगड संघ फायनल मध्ये दाखल झाला आहे .
सेमिफायनलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी . प्रजित नायर यांच्या मुख्यालय संघाशी देवगड ची लढत होती . या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी . प्रजित नायर यांनी अष्टपैलु कामगिरी करत संघाला सेमिफायनल पर्यत धडक दिली होती सेमिफायनल मध्ये मुख्यालय संघाने ४ षटकात प्रथम फलंदाजी करत ३२ धावंचे लक्ष देवगड संघाला दिले मात्र देवगडच्या सलामीवीर जोडी वैभव मराठे व सुनिल कोदले यांनी अप्रतिम फलंदाजी करत देवगड संघाला विजयी केल .
गेली सलग ५ वर्षे विजेता ठरलेला हा देवगडचा संघ उदया फायनल मध्ये कुडाळ संघाशी लढत देणार असुन उदया या फायनलकडे संपुर्ण सिंधुदूर्गवाशियांच लक्ष असुन देवगड संघ आपले विजेत पद टिकवणार कि कुडाळ संघ चॅम्पियन बनणार याकडे सर्वाचे लक्ष आहे .
यंदा देवगडची टीम गटविकास अधिकारी देवगड श्रीम .वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असुन पाहिल्या दिवशीचा खेळात देवगड संघ कबड्डी संघ पुरुष गट उप विजेता ठरला तर रस्सीखेच स्पधेत उपविजेता ठरला तर लंगडी पुरुष गटात उप विजेता ठरला असुन उदया दुसऱ्या दिवशी देवगडचा संघ इतर खेळातही आघाडीवर राहिल असे मत गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी आशा व्यक्त केली