ऍसिड सदृश्य पदार्थ पत्नीच्या अंगावर फेकल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

कणकवली दि.२ फेब्रुवारी(भगवान लोके)

दुसऱ्या पत्नीवर संशय घेऊन मारहाण करत ऍसिड सदृश्य पदार्थ पत्नीच्या अंगावर फेकल्याप्रकरणी पती तुकाराम गंगाराम कदम (५०, रा. कासार्डे कदमवाडी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पत्नीने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना २७ जानेवारी रोजी पुणे- पिंपरी येथे घडली.

तुकाराम कदम यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी व तुकाराम कदम यांचे लग्न 26 नोव्हेंबर 2015 रोजी झाले होते या अगोदर तुकाराम कदम व फिर्यादी ला दोन मुले होती. तुकाराम हा पत्नीवर संशय घेऊन नेहमी पत्नीला दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करायचा. फिर्यादी यांचा तीस वर्षाचा मुलगा 25 डिसेंबर 2023 रोजी मयत झाला त्यामुळे फिर्यादी व तुकाराम कदम हे दोघेही पुणे येथे गेले होते. त्यादरम्यान 27 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व पती तुकाराम कदम यांच्यात वाद झाला या वादातून तुकाराम याने पत्नीला कमरेवर लाथ मारून खाली पडले. ती उठत असताना पती तुकाराम याने काचेच्या बॉटल मधील ऍसिड सदृश्यपदार्थ पत्नीच्या तोंडावर मारले त्यामुळे तिच्या गळ्याखाली व छातीवर जळजळल्यासारखे होत होते. तुकाराम याची पत्नी त्यादिवशी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून बस पकडून कासार्डे येथे आली व घडलेली हकीकत आपल्या बहिणीला सांगितली. त्यानंतर तिच्या बहिणीने तिला भुईबावडा इथे बोलून घेतले. वैभववाडीतील सरकारी रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी आधी कणकवली उपजिल्हा रुग्णालय त्यानंतर जिल्हा रुग्णालयात येथे उपचार सुरु आहेत.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहेत.