सावंतवाडी दि.२ फेब्रुवारी
सावंतवाडी विभागाचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची कुलाबा येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे ते येत्या एक-दोन दिवसात आपला सावंतवाडी येथील पदभार सोडतील.
सावंतवाडी प्रांताधिकारी म्हणून प्रशांत पानवेकर यांना दोन वर्षे झाली. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्याचे त्यांनी काम पाहिले चांगले प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे त्यांनी केलेल्या कामाचे अनेक जण कौतुकही करत आहेत .मात्र लवकरच लोकसभा निवडणुका होऊ घातल्याने अधिकारी पदाचा कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर श्री. पानवेकर यांची कुलाबा उपजिल्हाधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे.