आम.नितेश राणे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर रिल्स व पोस्टरचा पाऊस

राणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण केलेली विकास कामे पोचवण्याचा केलेला प्रयत्न सध्या चर्चेचा विषय…

देवगड,दि.१० नोव्हेंबर

भाजपकडून कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी आमदार नितेश राणे यांचे नाव जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडवत यात केलेल्या विकास कामांच्या अनुषंगाने जनतेचे सोडविलेले प्रश्न व जनतेशी असलेली आमदार राणे यांचे नाते या साऱ्यांच्या माध्यमातून राणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण केलेली विकास कामे पोचवण्याचा केलेला प्रयत्न सध्या चर्चेचा विषय दिसत असून देवगडातील तरुणांनी बनवलेल्या रिल्स काही क्षणातच लाखो प्रेक्षक चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या कणकवली विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसापासून आमदार नितेश राणे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर रिल्स व पोस्टरचा पाऊस पडत आहे.यात केलेल्या विकास कामांच्या अनुषंगाने जनतेचे सोडविलेले प्रश्न व जनतेशी असलेले आमदार राणे यांचे नाते या साऱ्याच्या माध्यमातून राणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण केलेली विकास कामे पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.आमदार नितेश राणे यांनी कोरोना पासून ते आत्तापर्यंत केलेल्या विविध लोकहिताच्या कामांची रील्सही सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत.

आमदार नितेश राणे यांचा हायटेक प्रचार सध्या देवगड जामसंडे शहरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसत आहे. देवगड शहरातील युवकांनी हा हायटेक प्रचार हातात घेऊन प्रचारादरम्यान एखादा रुग्ण आजारी असल्यास त्याला मदतीचा हात देऊन आमदार नितेश राणे यांच्या शिकवणी प्रमाणे पहिली रुग्णसेवा नंतर प्रचार हेच ब्रीद वाक्य लक्षात ठेवत या तरुणांनी प्रथम त्या रुग्णावर रुग्णालयात नेऊन उपचार केले त्यानंतर पुन्हा प्रचारामध्ये सहभागी झाले अशा एक ना अनेक रिल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आमदार नितेश राणे यांच्या या हायटेक प्रचाराला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.