भावी आमदार संदेश पारकर व भावी पालकमंत्री नितेश राणे एकाच मंचावर….

‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो. हे त्रिवार सत्य….

देवगड,दि.११ नोव्हेंबर

राजकारणाचे हे वैशिष्ट्य आहे. राजकारणातील मित्र असलेले कधी शत्रू बनतील आणि शत्रू असलेले कधी मित्र होतील हे सांगता येत नाही.निवडणुकीच्या निकालाप्रमाणे याचाही आपण अंदाज बांधू शकत नाही.कालपर्यंत एकमेकांविरुद्ध मौखिक युद्ध लढवणारे उद्धव बाळासाहेब गटाचे शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर आणि आपला जुना मित्र म्हणून सांभाळून घेणारे भाजपचे उमेदवार नितेश राणे एकाच मंचावर आल्याने सर्वांच्या नजरा उंचावल्या मात्र निमित्त होते.

कुणकेश्वर येथे आयोजित कुणकेश्वर रापण महोत्सव १० नोव्हेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्हीही मातब्बर उमेदवारांनी एकाच वेळी कार्यक्रम स्थळी हजेरी लावल्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागून राहिले होत्या.

असे म्हटले जाते की,‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो. हे त्रिवार सत्य आहे आणि हे कोणी नाकारुही शकत नाही. सध्या विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार सुरू असताना आमदार नितेश राणे हे नेहमीच सांगतात की,संदेश पारकर हे माझे जुने मित्र आहेत.आणि आज दोन्ही मित्र कुणकेश्वर येथे आयोजित रापण महोत्सव निमित्ताने एकाच व्यासपीठावर आल्याने उपस्थित होते.भावी आमदार म्हणून संदेश पारकर व भावी पालकमंत्री आमदार नितेश राणे यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले.मात्र कुणकेश्वर महोत्सवामध्ये सन्मान कोणाचा आदी करायचा असा प्रश्न आयोजकांसमोर उभा राहिला मात्र मतदार संघात नाविन्य उपक्रम राबवून भरारी घेणारे आमदार राणे यांनी रापण महोत्सवामध्ये देखील सर्वप्रथम  इंट्री घेतल्यामुळे आमदार राणे यांचा सर्वप्रथम सन्मान करण्यात आला. त्यानंतर विरोधी उमेदवार संदेश पारकर यांचा देखील सन्मान शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थितांमधून एकच जल्लोष करण्यात आला. काही काळ दोन्ही उमेदवारांनी प्रेक्षकांमध्ये बसून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र उपस्थितांमध्ये कुणकेश्वर समुद्राप्रमाणे चर्चांना उधान आले आहे.