मालवण,दि.२ फेब्रुवारी
मालवण तालुका कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष दिलीप सांगवेकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर समाजाचे नूतन तालुकाध्यक्ष म्हणून प्रमोद भोगावकर तर सचिवपदी संतोष गुडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष म्हणून दिलीप सांगवेकर यांनी समाजाभिमुख विविध उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सांगवेकर यांनी उपाध्यक्ष पदी निवड होताच तालुक्याची नूतन कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली. यात जाहीर करण्यात आलेली तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष- संतोष देउलकर, सदस्य- उदय भोगावकर, नरेंद्र जिकमडे, सुरेंद्र जिकमडे, नारायण जिकमडे यांचा समावेश आहे.
यावेळी कुंभार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर, युवक अध्यक्ष मनोज वाटेगावकर, विनोद भोगावकर, भास्कर कुडाळकर तसेच तालुक्यातील कुंभार समाज बांधव उपस्थित होते.