ज्ञानदा ऍक्टिव्हिटी सेंटर मालवणच्या श्रीनिका नागवेकर हिने दुसरा क्रमांक

मालवण,दि.०२ फेब्रुवारी
एज्युस्मार्ट अक्टिव्हिटी सेंटर अबॅकस स्पर्धा परीक्षेचा सोळावा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पार पडला. या परीक्षेत ज्ञानदा ऍक्टिव्हिटी सेंटर मालवणच्या श्रीनिका नागवेकर हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

भारतभरातून २००९ हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. मालवण मधील नित्यानंद मयूर मुरकर, रोनीक यशवंत राणे, वेदा विराज पाटकर, ध्रुव मंदादीप किनळेकर, माही अजय रेडकर यांनी अंतिम फेरीत यश मिळवले आहे. तर श्रावणी दयाळ पाटकर, राजयोग भालचंद्र सामंत, पियुषा उमाकांत गावडे, रिजनल अचिव्हर पुरस्काराचे मानकरी ठरले. या विद्यार्थ्यांना ज्ञानदा ऍक्टिव्हिटी सेंटरच्या श्वेता पंकज पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले