कोकणचा ध्यास घेतलेले आमदार नितेश राणे यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद…

आम. नितेश राणेंच्या कार्याचा आई म्हणून मला गर्व आहे- नीलमताई राणे

देवगड ,दि. ११ नोव्हेंबर
आम. नितेश राणेंच्या कार्याचा आई म्हणून मला गर्व असून राणे साहेबांच्या मागोमाग संपूर्ण तालुकास्तर, जिल्हा ,राज्यभर नावलौकिक प्राप्त करत असताना या कोकणचा ध्यास घेतलेले आमदार नितेश राणे यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नितेश आणि निलेश हे दोन्ही झटत आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार नितेश राणे यांचे हॅट्रिक बरोबरच कुडाळ मालवण मतदार संघातून निलेश राणे यांना बहुमताने निवडून द्या म्हणजे या पुढील काळात जिल्ह्यातील सावंतवाडी सह तिन्ही आमदार तसेच खासदार या जिल्ह्याच्या विकासाकरता काय धमाल करतात याचे चित्र आपल्याला निश्चितपणे पाहावयास मिळेल. महायुतीच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक न्याय देत असताना या जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांना आवश्यक असलेले मार्केट निर्माण करण्याकरता व या येथील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी या पुढील काळात विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिजाऊ महिला बचत गटांच्या संस्थापक अध्यक्ष सौ नीलमताई राणे यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना केले. कणकवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर महिला मेळाव्याचे आयोजन देवगड व पडेल या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रणधुमाळी सुरू झाली असून कणकवली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आम.नितेश राणे यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन देवगड व पडेल येथे करण्यात आले होते.या मेळाव्यात जिजाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.निलमताई राणे,प्रवासी प्रभारी भाजप महिला मोर्चा कोकण ठाणे सौ.सुलक्षणा सावंत, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर ,सौ अस्मिता बांदेकर,सौ सुमेधा पाताडे,सौ सावी लोकेउपनगराध्यक्ष सौ .मिताली सावंत,भाजप जिल्हा उपाध्यक्ष सौ.प्रियांका साळसकर,तालुका अध्यक्ष उषकला केळुसकर,सौ,श्वेता शिवलकर,शुभांगी राणे ,सौ मनस्वी घारे,सौ प्राजक्ता घाडी नगरसेविका,सौ .तन्वी चांदोस्कर सौ प्रणाली माने,आद्या गुमास्ते,स्वरा कावले,मनीषा जामसंडेकर,ऋचाली पाटकर,नंदिनी नगरसेविका ,शहर अध्यक्ष सौ.तन्वी शिंदे,सौ नंदिता घाडी उपस्थित होत्या.सूत्रसंचालन सौ तन्वी चांदोस्कर यांनी केले.
या वेळी बोलताना प्रवासी प्रभारी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सौ सुलक्षणा सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनात आम.नितेश राणे यांचे कार्य सुयोग्य नियोजनात सुरू असून महिला भगिनींची ताकद ही त्यांच्या पाठीशी आहे हेच भगिनींचे प्रेम नितेश राणे यांना भरघोस मतांनी निवडून देईल व आम.नितेश राणे यांची हॅट्रिक कणकवली विधांनसभा मतदार संघात होईल.व ही जबाबदारी येथील लाडक्या महिला भगिनींची आहे.भाजपने सुरू केलेली कोणतीही योजना बंद होत नाही.उलट ही योजना कायमस्वरूपी सुरु रहाते.त्यामुळे या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता यावी ही मतदारांची इच्छा आहे असे आवर्जून सांगितले.
या वेळी सौ सुमेधा पाताडे,भाजप जिल्हा अध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांनी महायुती सरकारच्या महिला भगिनींच्या विविध योजनांचा ऊहापोह करून या निवडणुकीत विरोधी उमेदवार चे अनामत जप्त करून आम.नितेश राणे यांची हॅट्रिक पूर्ण करा असे आवाहन केले. या महिला मेळाव्यास हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.