देवगड,दि.०३ फेब्रुवारी
डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण येथे “Eco’s Echo” या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातून एकूण 13 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील अर्पिता वालावलकर, पारस गांवकर व मिहिर वेलणकर या विद्यार्थी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र, रोख रक्कम, वैयक्तिक ट्रॉफी आणि फिरता करंडक देऊन आयोजक महाविद्यालयाने सन्मानित केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विभागप्रमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत व संपादित केलेल्या यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ देवगड या संस्थेचे कार्यवाह आणि सहकार्यवाह यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे महाविद्यालयातून व समाजातून कौतूक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ देवगड संस्थेचे पदाधिकारी, देवगड कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Home आपलं सिंधुदुर्ग श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील अर्पिता वालावलकर, पारस गांवकर व...