सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा ४ फेब्रुवारीला होणार

परीक्षेचे औपचारिक उद्घाटन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या शुभहस्ते होणार

कणकवली दि .३ जानेवारी(भगवान लोके)

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- २०२४ ही ४ फेब्रुवारी २०२४ रोजी ११.०० ते १.०० यावेळेत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे औपचारिक उद्घाटन मुख्य परीक्षा केंद्र कणकवली कॉलेज, कणकवली येथे प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी कणकवली कॉलेज कणकवलीचे प्राचार्य युवराज महालिंगे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी. जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांची उपस्थिती असणार आहे.

विमानप्रवास, ISRO व गोवा सायन्स सेंटर भेटीसह अडीज लाखाची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र बक्षीस स्वरूपात असलेल्या या परिक्षेचे हे ७ वे वर्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. तर १०४६७ विद्यार्थ्यानी नोंदणी केली आहे.

परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्र – कणकवली कॉलेज, कणकवली आहे. तर फोंडा हायस्कूल, जि. प. शाळा खारेपाटण नं. १, वामनराव महाडिक विद्यालय, तरेळे, शिरगाव हायस्कूल, शाळा जामसंडे नं. १,देवगड – कुणकेश्वर नं. १, देवगड – पडेल हायस्कूल, पडेल – रामगड हायस्कूल, आचरा हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल मालवण, वराडकर हायस्कूल कट्टा, कुडाळ हायस्कूल कुडाळ, न्यू इंग्लिश स्कूल कसाल, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी, सैनिक स्कूलआंबोली, जि. प. शाळा माडखोल नं. १, जि. प. शाळा मळेवाड नं. १, जि. प. शाळा सांगेली, जि.प. शाळा मळगाव, खेमराज हायस्कूल बांदा, दोडामार्ग इंग्लिश स्कूल, दोडामार्ग न्यू इंग्लिश स्कूल भेडशी, वेंगुर्ला हायस्कूल, अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी या परीक्षा केंद्रांवर देखील परीक्षा होणार आहे.

तसेच परीक्षेची उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. त्याचप्रमाणे निकाला दिवशी पालक / शिक्षक /विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.

यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.