बोरीवली देवगड प्रवासी फेरी व्हाया चारकोप केल्याने प्रवाशांचा खोळंबा !

दोन तासांचा १८ कि मी चा वाढीव प्रवास उत्पन्न मात्र शुन्य ! आगार व्यवस्थापक निलेश लाड याकडे गांभीर्याने पाहणार का ?

देवगड,दि .३ जानेवारी (दयानंद मांगले)
देवगड आगाराची बोरिवली देवगड सायं ५.३० वा. परतीची प्रवासी फेरी व्हाया चारकोप केल्याने बोरिवली ते कांदिवली या पर्यंतचा सुमारे १८ की मी च्या प्रवास सुमारे दोन तासांचा होत असून या मार्गातील वाहतुकीची कोंडी,शयनासनी मोठी गाडी प्रसंगी ती वळविताना येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर मार्गातील सर्व थांबे घेत असताना एकाही प्रवाशांची न होणारी चढ उतार हे पाहता रापम अधिकारी यांचा व्हाया चारकोप करण्याचा अट्टाहास कोणासाठी आणि कशासाठी ?असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे प्रसंगी त्यापुढील प्रवासा करिता या प्रवासी फेरील थांब्यावर विलंब झाल्याने चार प्रवासी यांनी आपला प्रवास रद्द केला.आणि त्याचबरोबर नाहक होत असलेला खोळंबा यामुळे एसटी कर्मचारी व प्रवासी यांच्यात वाद होऊ लागले आहेत .याला जबाबदार कोण?यापूर्वीही याच पद्धतीने व्हाया गाडी करून कोणतेही उत्पन्न नसताना एसटी अधिकारी यांनी नसता खटाटोप केला होता.आता पुन्हा तोच उपदव्याप करून प्रवाशांना वेठीस धरण्याचं काम हे एसटी अधिकारी करीत आहेत. त्यातच फक्त देवगड आगाराच्या प्रवासी फेरीच्या माथ्यावर ही सक्ती केली जाते याकडे स्थानिक विभागीय कार्यालयाचे सुस्त अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी वर्ग स्थानिक प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करून आंदोलनाच्या भूमिकेवर पोहचले आहेत.
रापम परिपत्रकानुसार दि.२फेब्रु २०२४ पासून ही परतीची प्रवासी फेरी व्हाया चारकोप नियोजित चालक -वाहक घेऊन मार्गस्थ झाले. असून सदर गाडी व्हाया चारकोप करण्यासाठी निघाले बोरीवली नॅन्सी कॉलनी चे स्थानक प्रमुख मार्ग दाखवण्यासाठी सोबत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रवासी थांबे घेत गाडी मार्गस्थ केली असता वस्तुस्थिती दर्शक परिस्थिती या प्रमाणे आढळून आली .
वाढलेले १८ किलोमीटर अंतर
वाहतुकीची कोंडी त्यामुळे झालेला २तास उशीर
गाडीला यु टर्न घेण्यासाठी पुरेशी जागा नाही.
रस्त्याच्या एका बाजूने काम चालू असल्याने गाडी जेमतेम वाटवते
ब्रिज वरून जाण्यासाठी गाडी जाण्यासारखे जागा नाही. गाडी दोनदा सिग्नलमध्ये मागेपुढे करावी लागली.
सदर गाडी सायं ५.३० वा. बोरिवली नॅन्सी स्थानकातून सुटून व्हाया चारकोप केल्यामुळे ७.४५ च्या दरम्यान समता नगर कांदिवली येथे पोहोचली.
सर्व थांबे घेतले असतानाही या थांब्यांवर एकही प्रवासी चढ-उतार झालेला नाही .
पुढील थांब्यावरील आरक्षण केलेले प्रवासी गाडी उशिरा आल्यामुळे तक्रार करू लागले.चालक वाहक व प्रवासी वर्गात वाद होऊ लागले.
चार प्रवाशांनी गाडीला झालेला उशीर बघून प्रवास रद्द केला.पुढील प्रवास विलंब झाल्याने अमृतमहोत्सवी प्रवासी जेष्ठ वयोवृद्ध प्रवासी,महिला,याना या प्रवासाची फार मोठी झळ सोसावी लागली प्रवासातील वाढता विलंब त्यामुळे हैराण होत आहेत.एकंदरीत ही परिस्थिती पाहता हा खटाटोप कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे रापम प्रशासनाने गांभीर्याने पहावे व सदर प्रवासी फेरी पूर्ववत करण्यात यावी .अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे अन्यथा प्रवासी वर्गाच्या रोषास सर्वस्वी एसटी प्रशासन अधिकारी जबाबदार रहातील असा इशाराही प्रवासी वर्गाने दिला जात आहे.