निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारची जुमलेबाजी- इर्शाद शेख

वेंगुर्ला,दि .३ जानेवारी

केंद्र सरकारचा सादर करण्यात आलेला हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणूका असल्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प मांडता येत नाही पूर्ण २४-२५ या वर्षाचे अर्थसंकल्प जुलै महिन्यात केंद्रात नवीन येणारे सरकार मांडणार आहे. तरी सुद्धा केवळ आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्या भविष्यात निवडणूकीसाठी जुमला होता असे सांगण्यास भाजपची मंडळी मागे पुढे पाहणार नाही, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली आहे.

दोन कोटी घरे ही घोषणा दोन कोटी रोजगार देणार अशी पूर्वी केलेल्या घोषणे सारखीच आहे. रेल्वेचे तिन कॉरीडोर,चाळीस हजार वंदेभारत सारखे डबे, पर्यटन व्यवसायाला बिनव्याजी कर्ज, राज्याना केंद्र सरकार बिनव्याजी कर्ज देणार, शेतक-यांच्या मालासाठी गोदामे बांधणार, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज अशा अनेक फसव्या घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत. गेल्या दहा वर्षामध्ये १ लाख ५५ हजार कोटीचे कर्ज केंद्र सरकारने घेतले आहे. एवढ्या कर्जाचे काय केले याचे ठोस उत्तर केंद्र सरकारकडे नाही. टॅक्सची फेररचना या अंतरिम अर्थसंकल्पात नसते तरी सुद्धा सीतारामन यांनी सादर केलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये उद्योगपती साठी कार्पोरेट टॅक्स कमी करून हे सरकार उद्योगपती, धनदांडगे यांच्यासाठी असल्याचे दाखवून दिले आहे. परंतू यामध्ये मध्यमवर्गयांना टॅक्समध्ये सूट नसल्याचे इर्शाद शेख यांनी म्हटले आहे.