वेंगुर्ला,दि .३ जानेवारी
राधारंग फाऊंडेशन पुरस्कृत आणि परूळे युवक कला क्रिडा मंडळातर्फे वराठी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेत सर्वेश राऊळ याने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत जिल्ह्यातील १८ स्पर्धक सहभागी झाले होते. द्वितीय-वैष्णवी चव्हाण, तृतीय-केतकी सावंत व उत्तेजनार्थ-संपदा तांडेल यांनी क्रमांक पटकाविला. या सर्वांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार ५००, २ हजार आणि १ हजार तसेच राधाबाई चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण भालचंद्र केळुसकर व दिलिप ठाकूर यांनी केले. स्पर्धेसाठी बाळकृष्ण नाईक आणि गौरव पिगुळकर यांनी संगीतसाथ दिली.