आम.वैभव नाईक आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभा व वाहतूक व्यवस्थेत संदर्भात पाहणी

असा असेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा…

कणकवली,दि .३ जानेवारी(भगवान लोके)

उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्या 4 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास कुडाळ येथे दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर आज शनिवारी आमदार वैभव नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिजामाता चौक येथे होणाऱ्या कॉर्नर सभे संदर्भात व वाहतूक व्यवस्थेत संदर्भात पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,  बबन बोभाटे,  बाळा कोरगावकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रुती वर्दम, श्रेया गावंडे, ज्योती जळवी, सई काळप आदी उपस्थित होते. 

असा असेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ४ व ५ फेब्रुवारीचा कोकण दौरा जाहीर झाला आहे.
रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मोपा विमानतळावर आगमन व मोपा विमानतळ येथून सावंतवाडी कडे प्रयाण.
दुपारी १२.४५ वा. सावंतवाडी, गांधी चौक येथे शिवसैनिकांशी संवाद (सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ). दुपारी १.३० वा.
सावंतवाडी, गांधी चौक येथून कुडाळ कडे प्रयाण. २ वाजता कुडाळ, जिजामाता चौक येथे शिवसैनिकांशी संवाद (कुडाळ
विधानसभा मतदारसंघ), २.३० वा. कुडाळ येथून मालवण कडे प्रयाण. ३.२० वा. शासकीय विश्रामगृह, मालवण येथे आगमन, ४
वा. शासकीय विश्रामगृह, मालवण येथून मालवण बंदर जेटी कडे प्रयाण. ४.३० वा. मालवण बंदर जेटी येथे आगमन व किल्ले
सिंधुदुर्ग येथे प्रयाण, सायंकाळी ५.३० वा. मालवण बंदर जेटी येथून आंगणेवाडी कडे प्रयाण, ६ वा. आंगणेवाडी येथे आगमन,
६.१५ वा. आंगणेवाडी येथून कणकवली कडे प्रयाण. ७ वा. कणकवली, आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे शिवसैनिकांशी संवाद
(कणकवली विधानसभा मतदारसंघ, ७.३० वा. आ. वैभव नाईक यांचे निवासस्थान, कणकवली कडे प्रयाण,
सोमवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. कणकवली येथून राजापूर कडे प्रयाण, ११ वा. राजापूर जवाहर चौक येथे
शिवसैनिकांशी संवाद (राजापूर विधानसभा मतदारसंघ), ११.३० वा. राजापूर जवाहर चौक ते धूत पापेश्वर मंदिर कडे प्रयाण.
११.४५ वा.धूत पापेश्वर मंदिर दर्शन व मंदिर बांधकाम पाहणी, १२.१५ वा. धूतपापेश्वर मंदिर ते रानतळे-पावसमार्गे
रत्नागिरीकडे प्रयाण, दुपारी १.४५ वा. शिवसेना कार्यालय आठवडा बाजार येथे शिवसैनिकांशी संवाद (रत्नागिरी विधानसभा
मतदारसंघ), दुपारी २.१५ वा. आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी आगमन, ३ वा. आ. राजन साळवी यांच्या
निवासस्थान येथून विमानतळ रस्ता मार्गे करबुडे फाटा-उक्षी – वांद्री मार्गे चिपळूण कडे प्रयाण. सायंकाळी ५ वा. चिपळूण, इंदिरा
गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शिवसैनिकांशी संवाद (चिपळूण विधानसभा मतदारसंघ), ६ वा. चिपळूण येथून खेडकडे प्रयाण. ७.०५
वा. खेड रेल्वे स्टेशन येथून वंदे भारत एक्स्प्रेसने (२२२३०) मुंबईकडे प्रयाण असा दौरा नियोजित करण्यात आलेला आहे.