सावंतवाडी,दि.३ फेब्रुवारी
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून ओबीसी समाजाला भेडसावणारे प्रश्न भाजपच्या माध्यमातून सोडवले जातील. लवकरच मोठा मेळावा घेऊन समाजाच्या प्रश्नावर विचार मंथन केले जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीच्या जिल्हाध्यक्षपदी आनंद मेस्त्री तर उपाध्यक्षपदी दिलीप भालेकर, सिद्धार्थ भांबुरे, नारायण साळवी, ओंकार तेली, अमोल तेली, अंकुश वेटे यांच्यासह ९ जणांची निवड करण्यात आली आहे.
भाजपचे नेते माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, बाळा आकेरकर, दिपक काणेकर, विकी केरकर, दिलीप भालेकर, संजय विरनोडकर, आनंद पांढरे आदी उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्षपदी सिद्धार्थ भांबुरे, ओंकार तेली, अमोल तेली, राजेन्द्र आंबेरकर, नारायण साळवी, अंकुश वेटे, सुरेश ढवळ, शरद मेस्त्री, डॉ. सवेश नारकर, सरचिटणीस शांताराम (बाळा) आकेरकर, भूषण पोकळे, दीपक काणेकर, प्रकाश मेस्त्री, सचिवपदी कृष्णा तांडेल, सुनील मठकर, जगदीश चव्हाण, गाजन्नाथ धुरी, आनंद पांढरे, आनंद नेवगी, शंकर साळगावकर, अक्षय पार्सेकर, प्रवीण नाटेकर, कोशाध्यक्ष रितेश सुतार, महिला संपर्क प्रमुख संध्या परमेकर, युवा संपर्क प्रमुख सुधीर आरीवडेकर, महिला संपर्क प्रमुख लक्ष्मी सडवेलकर, युवक सह संपर्क प्रमुख अनिकेत घोंगडे, सोशल मिडिया संयोजक राम बांदेलकर, वैभव मेस्त्री, संदेश सुकळवाडकर, मनकी बात प्रमुख गणपत दशरोडकर, आनंद मेस्त्री, दिनेश मेस्त्री, कुणाल कुंभार, सदस्यपदी योगेश पाथरे, लक्ष्मण (बाळा) नाईक, संजय विर्नोडकर, माधवी बांदेकर, संदीप हळदणकर, सागर सांगेलकर, शंकर मेस्त्री, समीर कल्याणकर, साईनाथ धारगळकर, अजय परब, श्याम शेटकर, मनोज वाटेगावकर, सचिन खेडेकर, चंद्रशेखर मुळम, नारायण कुंभार, रवींद्र सांगवेकर, रामचंद्र भोई, साक्षी वाळके, विजय भोगटे, राजू पेडणेकर, प्रकाश मुणगेकर आदींची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष मेस्त्री पुढे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे या समाजाला भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे शासनाच्या विविध योजना समाजातील लोकांचे असणारे आर्थिक प्रश्न अशा बऱ्याच प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे तर या ठिकाणी काम करीत असताना समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फायदा झाला पाहिजे या अनुषंगाने काम केले जाईल सध्यस्थितीत सरकार भाजपाचे असल्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वांना मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील तसेच विविध प्रश्न घेऊन आम्ही शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करणार आहोत असाही शब्द त्यांनी यावेळी दिला.
ओबीसी समाजातील काही समाज अजूनही ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत त्यामुळे लवकरच प्रांताधिकारी यांना अभ्यासपूर्ण एक निवेदन लवकरच दिले जाईल असे राजन तेली यांनी सांगितले.