सावंतवाडी दि.३ फेब्रुवारी
सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसापासून भटक्या मोकाट कुत्र्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होऊ लागला आहे हे मोकाट कुत्रे पादचाराच्या पायांना चावत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे
वृत्तपत्र टाकणाऱ्या महेश शशिकांत पिळणकर याला शुक्रवारी सायंकाळी कुत्र्याच्या चाव्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. सावंतवाडी शहरातील राजवाडा शेजारच्या सबनीसवाडा भागाकडे जाणारा रस्त्यावर वृत्तपत्र टाकण्याचे काम करणाऱ्या महेश पिळणकर या तरुणाला कुत्र्याने अचानक हल्ला करत जावा घेतला त्यामुळे तो अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेला वृत्तपत्र टाकण्याचे काम करीत असणाऱ्या या तरुणाला मोकाट कुत्र्याने धावा घेतल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापूर्वी रंजन बांदेकर यांना देखील मच्छी मार्केट परिसरामध्ये पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता त्यानांही अशी दुखापत झाली होती. रंजन विश्वनाथ बांदेकर यांचा तो भाचा आहे.
सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठी फिरणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थी यांना देखील या मोकाट कुत्र्यांपासून भीती वाटते. पादचारी मार्गावर देखील हे मोकाट कुत्रे ग्रुपने असतात त्यामुळे त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नगरपरिषदेने याबाबत जलद गतीने खबरदारी घ्यावी म्हणून त्यांनी एक निवेदन देखील तातडीने दिले आहे