महायुतीचे चार -चार मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास ठप्प – आ.वैभव नाईक

खा.विनायक राऊत यांच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांकडे उमेदवार नाही

कणकवली दि.३ फेब्रुवारी(भगवान लोके)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना शासकीय मेडिकल कॉलेज चिपी विमानतळ मुंबई गोवा महामार्ग ही कामे पूर्ण झालीत मात्र गेल्या दोन वर्षात महायुतीचे चार -चार मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास देखील ठप्प झाला असल्याची टीका आ.वैभव नाईक यांनी केला.

खा.विनायक राऊत यांना उमेदवारी निश्चित झाली असताना विरोधकांना अद्याप उमेदवार मिळत नाही.मित्र पक्षांमुळे ज्यांनी पक्ष फोडला, दोन दोन मंत्री शिंदे गटाचे मंत्री असताना ते नारायण राणे यांचे केसरकर पाय धरताहेत, पंचमागणीमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कणकवलीत लोकांशी संवाद साधणार आहेत.त्यामुळे कणकवली येथील जाहीर सभेतून राज्याला दिसून येईल,की उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा पाठीशी आहे,असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.