उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यामुळे उत्साही वातावरण – संदेश पारकर

कणकवलीत ठाकरेंची जाहीर सभा ; विनायक राऊत तिसऱ्यांदा खासदार होतील

कणकवली दि.३ फेब्रुवारी(भगवान लोके)

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शिवसेना प्रमुख यांचा जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. जिल्हावासियांच प्रेम आणि आशिर्वाद हे उध्दव ठाकरेंच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कणकवली येते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असल्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले.

या दौ-याची तयारी करत असताना मोठ्या संख्येने उत्साह दिसुन आला. आणि उद्या सावंतवाडी ते कुडाळ , मालवण आणि कणकवली अशा प्रकारचा भरगच्च दौरा कार्यक्रम हा आहे. आणि कणकवली शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर त्या ठिकाणी उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.त्याचबरोबर जिल्हावासीयांच्या वतीने उध्दवजी ठाकरे यांच भव्य दिव्य स्वागत होणार आहे. खा. विनायक राऊत आणि आ.वैभव नाईक , जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण जिल्हा शिवसेनामय झालेला आहे. उत्साही वातावरण संपुर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे. खरंतर लोकसभेच्या २ निवडणूका खा. विनायक राऊत यांनी जिंकलेल्या आहेत. खरंतर खा. विनायक राऊत हे २ वेळा संपुर्ण जिल्ह्यामध्ये मतदार संघातून भरपुर मताधिक्याने निवडून आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभेच्या माध्यमातून तिस-यांदा विनायक राऊत हे विजयाची हॅट्रिक करतील ,असे संदेश पारकर यांनी सांगितले.
सतिश सावंत म्हणाले,शिवसेना पक्षप्रमुख
उध्दव ठाकरे यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.