दुबई – अबुधाबी सफर करून जेष्ठ नागरिक सुखरूप परत

सावंतवाडी,दि.३ फेब्रुवारी 
श्रीलंका, अंदमान,राजस्थान, केरळ ,रामेश्वर, गुजरात, काशी- गंगा- प्रयाग अशा दीर्घ अंतराच्या सहली करून झाल्यानंतर सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे २४ सदस्य सहा दिवसांची दुबई -अबुधाबी सफर पूर्ण करून सावंतवाडीत सुखरूप दाखल झालेत.
मासिक सभेच्या वेळी संपूर्ण दुबई सहलीचे वर्णन करून त्यांनी सुंदर व शिस्तबद्ध दुबई शहराची उपस्थित सदस्यांना माहिती करून दिली, तसेच आपण प्रजासत्ताक दिन दुबईतच साजरा केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
भावी काळामध्ये आपला देश अशाच प्रकारे बनवा, असे त्यांनी भाकीत व्यक्त केले.