मालवण तालुक्यातील कारसेवकांचा शिवजयंतीला सत्कार

मालवण,दि.३ फेब्रुवारी

अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम मंदिरासाठी प्रयत्न करणाऱ्या कारसेवकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या दि. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील २० कारसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.

राम मंदिराच्या लढयात कारसेवकांचे मोठे योगदान होते. अधोध्येत राम मंदिर साकारण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जिवाची देखील बाजी लावली. या कारसेवकांचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने यथोचित सत्कार करण्याचा निर्णय सौरभ ताम्हणकर यांनी घेतला आहे. येत्या १९ फेब्रुवारीला हा सत्कार केला जाणार आहे.