शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्ला,दि.३ फेब्रुवारी

बॅ.खर्डेकर महाविद्यालय यांच्यावतीने ग्रंथालय उपक्रमा अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती निमित्त १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही वक्तृत्व स्पर्धा पहिली ते दहावी शालेय गट व खुला गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.

शालेय गटासाठी ‘रयतेचा राजाः छत्रपती शाहू महाराज‘ हा विषय असून वेळ किमान ६ ते कमाल ८ मिनिटे आहे तर खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मसहिष्णूता‘ हा विषय असून वेळ किमान ८ ते कमाल १० मिनिटे इतका आहे.

लहान गटासाठी प्रथम १०००, द्वितीय ७५०, तृतीय ५०० व उत्तेजनार्थ दोघांना प्रत्येकी ३०० तसेच सर्वांना चषक व प्रमाणपत्र तर खुल्या गटासाठी प्रथम १५००, द्वितीय ११००, तृतीय ७५० व उत्तेजनार्थ दोघांना प्रत्येकी ५०० तसेच सर्वांना चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रा.पी.एम.देसाई (९४२३३०१२६५) किवा प्रा.डी.जे.शितोळे (९४२३८१९२१५) यांच्याशी संफ साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी केले आहे.