सुरंगपाणी येथे ८० जणांचे रक्तदान

वेंगुर्ला,दि.३ फेब्रुवारी

हेल्प ग्रुप फाऊंडेशन वायंगणीच्यावतीने केंद्रशाळा सुरंगपाणी येथे तालुकास्तरीय भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ८० जणांनी रक्तदान केले. उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संदिप पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वेंगुर्ला एसटी आगार प्रमुख राहूल कुंभार, माजी सरपंच श्यामसुंदर मुणनकर, खानोली सोसायटी चेअरमन प्रशांत खानोलकर, मुख्याध्यापिका शामल मांजरेकर, ग्रुपच अध्यक्ष सुमन कामत, उपाध्यक्ष हर्षद साळगांवकर, प्रविण राजापूरकर, महेंद्र सातार्डेकर, शेखर तोरस्कर, उल्हास कामत, नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, सिद्धेश कोचरेकर, जाई नाईक, सिद्धी गावडे, प्रेरणा राजापूरकर, भिकाजी गावडे, प्रसाद पेडणेकर, सुनिल नाईक आदी उपस्थित होते.