भूमी अभिलेख कार्यालयाने त्वरित प्रॉपर्टीकार्ड त्वरित द्या!

वेंगुर्ला,दि.३ फेब्रुवारी

प्रशांत सर्व्हेज पुणे या खासगी कंपनीकडून वेंगुर्ला शहरातील न.प. हद्दीतील प्रॉपर्टीचा सर्व्हे करण्यात आला. ठेकेदारांनी निविदेतील अटी, शर्तीप्रमाणे सर्व इमारतीचा अचूक सर्व्हे केल्याने ठेकेदाराचे कामाचे बील मंजूर करून देण्यात आले आहे. त्यामुळे आता भूमी अभिलेख कार्यालयाने त्वरित प्रॉपर्टीकार्ड द्यावीत, अशी मागणी वेंगुर्ला-भटवाडी येथील वनिता मांजरेकर यांनी उप अधिक्षक भूमी अभिलेख वेंगुर्ला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.