वैभववाडी भुईबावडा पाचल मार्गे रत्नागिरी ही एस.टी.बस फेरी सुरु

वैभववाडी, दि.३ फेब्रुवारी
वैभववाडी भुईबावडा पाचल मार्गे रत्नागिरी ही एस.टी.बस फेरी सुरु करण्यात आली आहे. सकाळी ७ वा. वैभववाडी येथून ही बस रत्नागिरीसाठी उंबर्डे, भुईबावडा , पाचल मार्गे रत्नागिरी व रत्नागिरीहून दुपारी ३ वा. सुटून याच मार्गे ती वैभववाडीला सायंकाळी ७ वा. पोहचते. ही बस फेरी सुरु करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ नागप यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची सोय होणार आहे.
रत्नागिरी ते भुईबावडा ही एस.टी.बस काही महिण्यापासुन सुरु करण्यात आली होती.ही बस वैभववाडीपर्यंत विस्तारीत केली तर वैभववाडी तालुक्यातील सर्व गावांना पाचल, ओणी, लांजा व रत्नागिरीकडे जाण्यासाठी सोयीचे होईल. याचा विचार करुन सामाजिक कार्यकर्ते नागप यांनी ही बस फेरी वैभववाडीपर्यंत विस्तारीत करण्यासाठी रत्नागिरी आगार व्यवस्थापक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. वैभववाडी येथे वस्तीला येणाऱ्या या बसच्या चालक व वाहक यांच्या निवासाठी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीकडेही पाठपुरावा केल्यामुळे ही बस फेरी सुरु करण्यात आली आहे. तालुक्यातील  प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन  एस.टी. विभागाकडून करण्यात आले आहे.