होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या होडावडे गावातील विदयार्थी यांना परीक्षा साहित्य व शुभेच्छा पत्राचेवाटप .

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई ,शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार

सावंतवाडी, दि.३ फेब्रुवारी

आज विदयार्थी यांनी दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे नाव उज्वल करा. स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन चागल्या पदावर नोकरी करा आपला सर्वागीण विकास साधा असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष समिर सावंत यांनी मार्गदर्शन केलं.
होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या होडावडे गावातील विदयार्थ्याना परीक्षा साहित्य व शुभेच्छा पत्र देण्यात आली त्यांचां वितरण कार्यक्रम होडावडे शाळा क्रमांक एक या ठिकाणी संपन्न झाला.होडावडे ग्रामोन्नती मंडळ नेहमी शालेय विदयार्थी याच्या सर्वागीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असते. त्यामुळें विद्यार्थी यांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेणे गरजेचे आहे.
यावेळी होडावडे गावातील ३०च्या वर दहावी व बारावीची या वर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रम वेळी प्रमूख मान्यवर म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर सावंत, कमिटी सदस्य तथा होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई प्रतिनिधि उमेश पावणोजी,होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई स्थानिक प्रतिनिधि रामचंद्र कुडाळकर, होडावडे, माजी सरपंच सौ. अदिती नाईक, शाळा क्रमांक एकच्या मुख्याध्यापक सौ प्रशांती दळवी, सौ तन्वी बांदिवडेकर, सौ अर्चना मक्राने, मानसी होडावडेकर, तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पावणोजी व आभार रामचंद्र कुडाळकर यांनी केले.