देवगडातून उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार-तालुकाप्रमुख मिलिंद साटम

देवगड, दि.३ फेब्रुवारी

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कणकवली शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या समोर आयोजित करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातील तीन जिल्हा परिषद विभाग व देवगड-जामसंडे नगर पंचायत.शिरगाव,किंजवडे.,मिठबाव,कुणकेश्वर जिल्हा परिषद
सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी शिरगाव बाजारपेठ येथे सायंकाळी पाच वाजता तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिकांनी एकत्रित जमून आपल्या वाहनांना भगवा झेंडा लावून आपल्याला कणकवलीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मिलिंद साटम जयेश नर यांनी दिली.