कळणे खनिज वाहतूक मुळे दोडामार्ग बांदा मार्गावर धुळीचे साम्राज्य

दोडामार्ग महसूल विभाग मूग गिळून गप्प दुचाकी धारक हैराण पाच वाजता वाहतूक बंद न करता राञी वाहतूक

दोडामार्ग, दि. 3 फेब्रुवारी 

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या कळणे ते रेडी खनिज वाहतूक करणारे शेकडो डंपर सर्व नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहतूक करत आहेत. नियम धाब्यावर बसवून ही वाहतूक सुरू असून कळणे ते बांदा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खनिज रस्त्यावर पडून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी खनिज साफसफाई केली जात नाही पाणी मारले जात नाही त्यामुळे दुचाकी वाहन धारकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर पडलेले खनिज नाका तोंडातून शरीरात जात आहे त्यामुळे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खनिज पडून धुळीचे साम्राज्य झाले असताना दोडामार्ग येथील महसूल अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. पाच वाजता वाहतूक बंद न ठेवता राञी वाहतूक केली जाते जिल्हा खर्निकर्म अधिकारी खनिज कंपनीला पाठीशी घालत आहेत. असा आरोप केला जात आहे.

कळणे खाणीतून शेकडो डंपर दोडामार्ग ते बांदा मुख्य मार्गावर नियम धाब्यावर बसवून सकाळी पहाटे ते रात्री उशिरापर्यंत ही वाहतूक करतात या ठिकाणी खनिज वाहतूक करणारे डंपर याना वाहतूक संदर्भात दिलेले नियम पायदळी तुडवले जात आहेत. एका मागोमाग दहा ते पंधरा डंपर सोडले जातात यात शंभर ते पन्नास फुट अंतर न ठेवता चार पाच फूट अंतर ठेवून सुसाट डंपर सोडले जातात यामुळे या मार्गावर प्रवास करणे धोक्याची घंटा बनली आहे. याकडे दोडामार्ग महसूल विभाग अधिकारी वाहतूक पोलीस देखील बघ्यांची भूमिका घेत आहेत.