दोडामार्ग विजघर मार्गावर मोटार सायकल वरून दारू वाहतूक दोन जण ताब्यात

दोडामार्ग, दि. ३ फेब्रुवारी

दोडामार्ग ते विजघर मार्गावर मोटार सायकल वरून गोवा बनावटीचे दारू वाहतूक करताना विजघर पोलीस चेकपोस्ट येथे दोन युवकांना थांबवले असता गोवा बनावटीचे दारू सापडून आली या प्रकरणी कोनाळकट्टा पोलीस दूर क्षेत्र येथील पोलीस गवस देसाई यांनी मोटार सायकल सह ९४ हजार ११८० रूपये मुद्देमाल ताब्यात घेतला मोटार सायकल चालकांवर युवकावर गुन्हा दाखल करणे सुरू होते. शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली.