इंटर कॉलेज ज्यूदो स्पर्धेमध्ये फोंडाघाट चा भूषण तोरस्कर प्रथम

फोंडाघाट, दि. 3 फेब्रुवारी (संजय सावंत)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आयोजित इंटर कॉलेज लेवल ज्यूदो स्पर्धेमध्ये
आझाद ज्युदो असोसिएशन, फोंडाघाट चा विद्यार्थी भूषण प्रवीण तोरस्कर याने -६०किलो वजनी गटात सहभाग नोंदवुन ” प्रथम क्रमांक ” प्राप्त केला आहे.
त्याची ५ ते ७ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरुनानकदेव विद्यापीठ, अमृतसर ( पंजाब ) येथे होणाऱ्या ” ऑल इंडिया विद्यापीठ ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जळगाव येथे २७/०१/२०२४ रोजी संपन्न झालेल्या
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आयोजित इंटर कॉलेज लेवल ज्यूदो स्पर्धेमध्ये सर्व वजनी गटामधून राज्यातील 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी आझाद ज्युदो असोसिएशन, फोंडाघाट चा विद्यार्थी भूषण प्रवीण तोरस्कर याने -६०किलो वजनी गटात सहभाग नोंदवुन ” प्रथम क्रमांक ” प्राप्त केला आहे. त्याला आझाद ज्युदो असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य आणि सर्व आजी माजी खेळाडू यांनी सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.