आचरा, दि. 3 फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर याची आचरा पोलीस स्टेशन येथून जिल्हा सायबर गुन्हा विभागात बदली झाली. याबद्दल आचरा पोलीस स्टेशन कर्मचारी वर्गाने फुलांच्या पायघड्या घालत फुलांची उधळण करुन मानवंदना देत निरोप दिला. यावेळी प्रत्येक जण भावूक झाले होते.
आठ महिन्या पूर्वी आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्विकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी लोकांशी सलोख्याचे संबंध प्रस्तापित करत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यतत्परता दाखवली होती. नैसर्गिक आपत्ती वेळी आम्रवृक्षाखाली अडकलेल्या महिलेची सुटका करुन तिचा जीव वाचविला होता. पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना कधी अधिकारी पणा न दाखवता कर्मचाऱ्यांशीही सलोख्याने वागण्यामुळे एक आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्या बदली मुळे आचरा पोलीस स्टेशनला आयोजित निरोप समारंभात सर्व उपस्थित पोलीस कर्मचारयांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव वेगळाच होता.अशा अधिकार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा काम करायला मिळावे अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हर्षाली पाटील, स.पो उपनिरीक्षक महेश देसाई,सौ मिनाक्षी देसाई, सुदेश तांबे, स्वप्नाली तांबे,मिलिंद परब,सौ मनस्वी परब,तुकाराम पडवळ,स्वाती आचरेकर,संदीप कांबळे,मनोज पुजारे,डी डी चव्हाण,पुरळकर या पोलीस कर्मचारयांसह पत्रकार अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत, उदय बापर्डेकर, विवेक परब यांसह प्रकाश मेस्त्री आदी उपस्थित होते.