कांदळगाव येथील रामेश्वर मंदिराचा ५ रोजी कलशारोहण वर्धापन दिन

मालवण, दि. 3 फेब्रुवारी

कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिराच्या कलशारोहणाचा २२ वा वर्धापन दिन सोहळा दि. ५ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. लघुरुद्र, दुपारी १२ वा. आरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. – हळदीकुंकु, संध्याकाळी ५ वा. – स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. महापुरुष कलावैभव दशावतारी नाट्यमंडळ यांचा ‘वराहीदेवी’ हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडल कांदळगाव राणे, परब मानकरी आणि कांदळगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.