कणकवली दि.३ फेब्रुवारी(भगवान लोके)
सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी समाजभुषण संदीप लहु कदम यांची निवड करण्यात आली .संदीप कदम हे छ . शिवाजी महाराज , शाहु , फुले ,आंबेडकर चळवळीतील लोक संपर्क असलेले नेते आहेत . एकेकाळी मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार डॉ . भालचंद्र मुणगेकर यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणुन त्यांची राजकीय ओळख आहे . कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणुन ते काम करत आहेत .माध्यमिक पतपेढीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक आहेत . तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष असुन कर्मचारी संघटनेचे नेते म्हणुन ते परिचित आहेत . कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक मोर्चे आंदोलने निदर्शने करण्यात ते नेहमी आघाडीवर असतात . सामाजिक ,सांस्कृतिक ,क्रिडा , सहकार क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान असल्याने समाजसेवेचा राज्य स्तरीय समाजभुषण पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राप्त झालेला आहे . त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेवुन त्यांना आज उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली .
यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर , आमदार वैभव नाईक ,जिल्हाप्रमुख संदेश पारकर , उपनेते गौरीशंकर खोत ,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत , युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , माजी नगरसेवक कन्हैया पारकर आधी उपस्थित होते .