मालवण,दि.०३ फेब्रूवारी
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबईत घर किंवा घराची रक्कम मिळावी अशी मागणी करणारा ठराव कणकवली येथे पार पडलेल्या गिरणी कामगार, वारसदार यांच्या मेळाव्यात करण्यात आला या ठरावाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात यावी, असे ठरविण्यात आले.
कणकवली येथे गिरणी कामगार, वारसदार यांचा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबईत घर किंवा घराची रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली ।या मागणीसाठी जास्तीत जास्त गिरणी कामगार व वारसदार यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा तसेच या मागणीसाठी नेमण्यात आलेल्या तालुकानिहाय प्रतिनिधीकडे संपर्क करावा असे आवाहन गिरणी कामगार – वारसदार न्याय व हक्क संघटना सिंधुदुर्ग व रत्नागिरी या संघटनेच्या अध्यक्षा सौ. रश्मी राजेंद्र लुडबे यांनी केले आहे.