कणकवली दि.३ फेब्रुवारी(भगवान लोके)
ओरोस -गावराई शिंदे शिवसेना शाखेचेउद्घाटन करताना कल्पवृक्ष लावून शिवसेना संघटना वाढीसाठीघातलेला नवा पायंडा स्तुत्य असून गौराई गावाच्या विकासासाठी आणि विविध योजना गावात राबविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून योगदान दिले जाईल योग्य ती मदत आणि सहकार्य करू अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केली
गावराई येथे शिंदे शिवसेना शाखेचे उद्घाटन आणि पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि कल्पवृक्ष लावून कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनीकेलीयावेळीमहिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर ,कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल सावंत , शिवसेना मुख्य संघटक रुपेश पावसकर , शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर , कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर ,योगेश तुळसकर ,कुडाळ महिला तालुकाप्रमुख दीक्षा सावंत , रत्नाकर जोशी ,रामकृष्ण गडकरी , रामचंद्र परब , पुंडलिक जोशी राजू साधले आदिपदाधिकारी गावातील ग्रामस्थ महिला शिवसैनिकमोठ्या संख्येने उपस्थित होते जयशिवसेना ,जयशिवाजी च्या घोषणा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय शिरोडकर यांनी केले यावेळी शाखाप्रमुख श्रीकृष्ण चिंदरकर यांच्या नेतृत्वाखालीशिवसेनेचेउपशाखाप्रमुख अनंत फाले महिला ग्राम प्रमुख सौः जयमाला वेगुर्लेकर ,तालुका प्रतिनिधी विनय शिरोडकर आणि कार्यकारणी सदस्य विजय कदम , कल्पेश आयरे , महेश जुयेकर , विपल मांजरेकर प्रकाश शिरोडकर यासह मोठ्याप्रमाणात शिवसैनिकाना जिल्हाप्रमुख संजयआंग्रे याच्या हस्ते शिवसेनेची शाल घालून प्रवेश दिला
यावेळी बोलताना संजय आंग्रे म्हणाले गावात शिवसेना पक्ष संघटनेची सुरुवात कल्पवृक्ष लावून केली हा एक नवा पॉईंट आहे पक्षाची संघटना अधिक मजबूत होण्यासाठी शासनाच्या विविध योजना घरेलू कामगार मुख्यमंत्री सहायता रत्नसिंधू सारख्या विविध योजना उद्योग उभारण्यासाठी कार्यक्रम राबविण्यासाठी आम्ही सहकार्य करू पाठीशी राहू गावातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी आणि समस्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव मदत करू अशी काही देत लवकरच आपल्या सूचनेनुसार शिवसेना पक्ष मेळावाघेतला जाईल असेही त्यांनी सांगितले
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर म्हणाल्या गावात महिला आणि पुरुष अपेक्षित अशी संघटना वाढीसाठी प्रयत्न करूया लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील या दृष्टीने प्रयत्नशील राहू या गावाच्या विकासासाठी आणि आपल्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत जिल्ह्यात विकास कामाचा आराखडा कामे नियोजन च्या माध्यमातून घेतली जातात आपल्या गावातील अनेक योजना निराधार किंवा आरोग्याच्या दृष्टीने महिलांच्या विविध योजना राबविण्यासाठी आम्ही सहकार्य करू
जिल्हा संघटक रुपेश पावस्कर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी गावागावातील हे पक्षप्रवेश आणि लोकांचा विश्वास अधिकाधिक सार्थकी लागेल आपण आमच्या पक्षांमध्ये प्रवेश करून संघटना वाढीसाठी करत असलेला प्रयत्न आणि विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीशिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनीपक्ष संघटना वाढीसाठी लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे हे अधिकाधिक बळकट करूया गावागावा संघटना जोमाने बांधूया आपल्यासारख्या गावरानगावातून मिळणारा प्रतिसाद हा सत्य आहे महिला तालुकाध्यक्ष दिक्षा सावंतम्हणाल्या पुरुषांच्या बरोबर महिलांनी या पक्ष संघटना वाढीसाठी जोर दिला पाहिजे अधिकाधिक शिवसेना पक्ष वाढवूया
कुडाळ तालुका प्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर म्हणाले ग्रामीण भागात शिवदूत सहयोजना राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत गावरान मध्ये या योजना राबविण्यासाठी प्रयत्न करू त्यातून पक्ष वाढीसाठीहातभार लागेल आपल्या अडीअडचणी मार्गी लाव तर अरविंद करालकर म्हणाले गावडे गावात अनेक विकास कामांना मूर्ती कलाकार असो किंवा भजनी कलाकार असो त्यांना लाभ देण्यासाठी आपण समितीवर कार्यरत असून आपले प्रस्ताव विविध योजना मंजूर करून आपण आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थक केलारत्नकर जोशी यांनी शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे सिंदूरत्न योजना बांधकाम कामगार योजना नोंदणी घरेलू कामगार योजना विविध उद्योगाच्या योजना काथ्या उद्योग केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती यावेळी दिली राज्याचे उद्योग मंत्री हे या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून उद्योगाच्या विविध योजना आणण्यासाठी काम करूया हे महायुतीचे सरकार गावातील विकास कामांना गती देत आहे त्याचा फायदा होईल शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले