देवगड बोरवली फेरी पूर्वीप्रमाणे करा अन्यथा आंदोलन छेडू माजी आमदार अजित गोगटे यांचा इशारा

स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

देवगड, दि.०४ फेब्रुवारी
राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारातून सुटणारी बोरवली देवगड सायं.५.३० वा.सुटणारी परतीची प्रवासी फेरी च्या मार्गात बदल करण्यात येऊन बोरिवली येथून सदर फेरी मार्गस्थ होऊन बोहरा कॉलनी, डहाणूकर कॉलनी मार्गे कांदिवली समता नगर या ठिकाणी येथे या प्रवासात सुमारे १८ कि.मी अंतराची वाढ झाली असून सदरची फेरी दीड ते दोन तास उशिराने पुढील थांब्यावर पोहचते त्यामुळे थेट प्रवाशांना देवगड व अन्य भागात पोहचण्यास विलंब होत आहे.देवगडकडे येणाऱ्या प्रवाशांना ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवासी फेऱ्या मिळत नाहीत. त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सदर प्रवासी फेरीचा मार्ग पूर्वीप्रमाणे करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार अजित गोगटे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी देवगड आगार व्यवस्थापकांना लेखी पत्राद्वारे दिला आहे .यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठुकरुल,दयानंद पाटील उपस्थित होते.